माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो . मी पूर्ण वर्ष या दिवसाची वाट पाहतो . त्या दिवशी मी लवकर उठतो . आंघोळ करून नवीन कपडे घालतो . घरात मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करतो .
शाळेत तर काय खूप मजा असते . माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात . मी शाळेतील ग्रंथालयाला पुस्तक भेट म्हणून देतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल .
माझ्या वाढदिवसाला माझे सगळे मित्र घरी येतात , मला शुभेच्छा देतात आणि नवीन भेटवस्तू देतात . मग मी केक कापून सर्वांना वाटतो . आम्ही खूप मजा करतो . वेगवेगळे खेळ खेळतो . गोष्टी सांगतो . बाबा सगळ्यांचे फोटो काढतात .
माझ्या वाढदिवसादिवशी सगळे माझा खूप लाड करतात . त्या दिवशी मला कोणीच रागवत नाही . मला माझा वाढदिवस खूप आवडतो .