विशेषण ( Adjective ) :-
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
१) शाळेत
खूप मुले असतात.
वरील वाक्यात "मुले" या नामाबद्दल "
खूप " हे विशेषण माहिती देते.
२) रस्त्याने जाताना बाईंनी
विविध झाडांची माहिती सांगितली.
वरील वाक्यात "
झाड़" या नामाबद्दल "
विविध" हे विशेषण माहिती देते.
३)
ताजी आणि
रसाळ फळे खावीत.
वरील वाक्यात "फळे" या नामाबद्दल "
ताजी " आणि "
रसाळ " ही दोन विशेषणे माहिती देतात.