विराम चिन्ह (Punctuation)


विरामचिन्हे  ( Punctuation  Marks ) :-

आपण बोलताना मध्ये मध्ये थांबून बोलतो, त्यास ' विराम ' असे म्हणतात .
लिहिताना हा विराम ज्या चिन्हाने दर्शवला जातो, त्यास ' विरामचिन्हे ' असे म्हणतात .
 
विरामचिन्हे (Punctuation Marks) उदाहरणार्थ
पूर्ण विराम (.) (Full Stop) रमा हुशार आहे.
स्वल्प विराम(,) (Comma)  माधव,इकडे ये.
अर्ध विराम (;) (Semi Colon) तो एक चलाख माणूस आहे; असे त्याचे मित्रही मानतात.
अपूर्ण विराम (:) (Colon) कृष्णाची खूप नावं आहेत :गोपाळ,गिरिधर,मोहन
प्रश्न चिन्ह (?) (Question Mark)  तुझ्या शाळेचे नाव काय आहे ?
उद्गारवाचक चिन्ह (!) (Exclamation Mark) व्वा! छान चित्र आहे.
अवतरण चिन्ह (“ “) ,  (‘ ') (Inverted Commas) अनय म्हणाला,"माझ्या घरी ये."
संयोग  चिन्ह (-) (Hypen) मेधाने परीक्षेच्या वेळी  दिवस - रात्र अभ्यास केला .
अपसारण  चिन्ह (_) (Underline)  मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे.
विकल्प चिन्ह (/) आज मी मराठी/हिंदीचा अभ्यास करेन.

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0393440723