क्रियापदाचे प्रकार १.
स्थिती ( जे आहे ते ) व स्थित्यंतर ( दुसरी अवस्था ) क्रियापद :
' अस ' हा धातू स्थिती दाखवतो तर ' हो ' हा धातू स्थित्यंतर दाखवितो.
१. मी विद्यार्थी
आहे. ( अस - धातू - पहिली अवस्था )
२. मी उपजिल्हाधिकारी
झालो. ( हो - धातू - दुसरी अवस्था)
२.
सकर्मक क्रियापद :
' वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासल्यास म्हणजेच कर्म उपस्थित असल्यास त्यास ' सकर्मक क्रियापद ' म्हणतात.
१. सरला पात्र
लिहिते.
२. अमित आंबा
खातो.
३. देवकी तक्रार
करते.
४. आजी दृष्ट
काढते.
३.
अकर्मक क्रियापद :
' क्रिया कर्त्यापासून सुरु होऊन कार्ट्यापाशीच थांबत असेल म्हणजेच कर्म नसल्यास त्यास ' अकर्मक क्रियापद ' म्हणतात.
१. मला थंडी
वाजते.
२. वाघाला पाहताच हरीण
पळाले.
३. मला चंद्र
दिसतो.
४. सर्वांना मराठी
आवडते.
४.
व्दिकर्मक क्रियापद :
ज्या वाक्यात दोन कर्म असतात त्यांना ' व्दिकर्मक क्रियापद ' म्हणतात.
१. तू
नारायणला पुस्तक दे.
२. शिक्षक
विध्यार्थ्यांना मराठी शिकवतात.
३. शिक्षक
विध्यार्थ्यांना प्रश्न विचारतात.
४. यशोदाने
श्रीकृष्णाला लोणी दिले.
प्रत्यक्ष कर्म - वस्तुवाचक कर्म प्रत्यक्ष कर्म असतात. त्यांची विभक्ती ' द्वितीया ' मानतात.
अप्रत्यक्ष कर्म - व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. त्यांची विभक्ती ' चतुर्थी ' मानतात.
उदा. द्रोणाचार्य
अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात.
अप्रत्यक्षकर्म प्रत्यक्षकर्म
५.
उभयविद क्रियापद :
एकच क्रियापद
सकर्मक व अकर्मक अश्या दोन्ही अर्थाने आल्यास त्यास ' उभयविद क्रियापद ' म्हणतात.
१. रिनाने लाकडी बॅट
मोडली. ( सकर्मक )
२. ती लाकडी बॅट
मोडली. ( अकर्मक )
३. तिने घराची खिडकी
उघडली. ( सकर्मक )
४. तिच्या घराची खिडकी
उघडली. ( अकर्मक )
६.
संयुक्त क्रियापद ( धातुसाहित + सहायक क्रियापद ) :
धातुसाहित + सहायक क्रियापद अशी रचना असून एकाच कृतीचा बोध झाल्यास त्यास ' संयुक्त क्रियापद ' म्हणतात.
१. राजा, एवढा लाडू
खाऊन जा. ( दोन क्रियांचा बोध - संयुक्त क्रियापद नाही )
२. राजा, एवढा लाडू
खाऊन टाक. ( एकाच कृतीचा बोध - संयुक्त क्रियापद आहे.)
३. मला नोकरी सोडावी
लागली.
४. माझा निबंध लिहून
झाला.
७.
सिद्ध क्रियापद :
उठ, बस, कर, जा, खा, पी, ये यांना सिद्ध धातू म्हणतात. यापासून तयार केलेल्या क्रियापदास ' सिद्ध क्रियापद ' म्हणतात.
उदा.
जा - जातो,
ये - येतो,
खा - खातो,
बस - बसतो,
कर - करतो इ.