पुढील वाक्य वाचा :-
मुलगा
चांगला खेळतो
मुलगी
चांगली खेळते
ते
चांगले खेळतात
वरील वाक्यांतील 'चांगला, चांगली, चांगले' है शब्द विशेषणे आहेत. परंतु ती विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी आहेत. त्यामुळे ही
क्रियाविशेषणे आहेत, पण ती विकारी आहेत. (लिंगानुसार बदलणारी) म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये नाहीत.
1. विशेषण हा विकारी शब्द आहे म्हणजे विशेष्याच्या लिंगवचनानुसार विशेषणाच्या रूपात बदल होतो.
जसे -
मोठा ग्रन्थ
मोठी पोथी
मोठ्या पोथ्या
2. हा बदल आकारांत विशेषणांत होतो. याला अपवाद आहे तो आकारांत संख्याविशेषणांचा
उदा.
सहा मुली
अकरा मुलगे
बारा स्त्रिया
तेरा मुले
3. शब्दांचे व्याकरण चालवताना विशेषणाचे लिंग व वचन सांगण्याची पद्धती नाही. कारण ते विशेष्याच्या लिंगवचनाप्रमाणे असते.
4. विशेषणास विभक्त्ति प्रत्यय लावण्याची पद्धती नाही