मराठी म्हणी (Idioms)


“अ”
 
अती तेथे माती  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला कि,त्याचा परिणाम नुकसानकारक ठरतो .
असतील शिते तर जमतील भुते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.
अचाट खाणे म्हसनात जाणे खाणे-पिणे हे शरीरपोषणासाठी असते याचे भान न ठेवता अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात.
अती शहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करतो,त्याच्याकडून कोणतेही उपयॊगी किंवा मोठे काम होत नाही .
अहो रुपम अहो ध्वनी एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे.
अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या बुद्धिमान माणसालाही अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते .
अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
असेल दिवाळी तर नसेल शिमगा असेल तेव्हा भरपूर खर्च उधळपट्टी करणे, नसेल तेव्हा उपाशी राहणे.
अडली गाय फटके खाय संकटात किंवा अडचणीत सापडलेल्यानाच अधिक त्रास दिला जातो.
अळी मिळी गूप चिळी रहस्य उलघडू नये म्हणून सर्वांनी शांत बसणे.
अटक्याचा सोंठा, थेरझारा सौदा अडल्या कामासाठी अधिक अडचणीत आलेल्या माणसांची केविलवाणी स्तिथी होणे.
अघळपघळ आणि घाल गोंधळ मोठमोठ्या बाता करणारा माणूस कामात व्यवस्थित असतो.
अधिक सूट पाहुण्याकडे अधिक सवलतीचा अधिक कामासाठी उपयोग करणे.
आला चेच तर केला देव नाहीतर हर हर महादेव कोणतीही गोष्ट नियमितपणे करायची नाही.
आहेर नारळाचा आणि गर्जर वाजंत्र्याचा थोडेसेच करायचे पण त्याचा गाजावाज मात्र अधिक करायचा.
आत्याबाईला मिशा आल्या तर काका म्हटले जाते जी गोष्ट करणे शक्य नसते त्याबद्दल समर्थन करणे.
आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना दोन्हीकडून अडचणीत आलेल्या माणसांची केविलवाणी स्थिती होणे.
आठ हात लाकूड नऊ हात ढलपी महत्त्वाच्या गोष्टीपेक्षा इतर बाबींचा पसाराच अधिक.
आपला तो बाब्या दुसऱ्याचे कार्टे स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. 
आधी दिवा घरी नेला मग दुसरा मंदिरी ठेवा प्रथम आपले घर सांभाळावे नंतर सार्वजनिक काम करावे.
आणतो उसनवारी, मिरवतो जमादारी दरिद्री माणूस मोठेपणाचा आव आणतो.
आधी जाते बुद्धी मग जाते भांडवल आधी माणसाचा विवेक नष्ट होतो नंतर त्याचे नुकसान होते.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे .
आज रोख उद्या उधार पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये .
आयत्या बिळावर नागोबा कष्ट न करता,सहज मिळणाऱ्या संपत्तीवर कब्जा करणे .
आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
आईचा काळ बायकोचा मवाळ आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
आपलेच दात,आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे निर्माण झालेली अडचणीची स्थिती
आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
आधी पोटोबा,मग  विठोबा पहिले पोटाची सोय पहावी,नंतर देवधर्म करावा .
आचार भ्रष्टी सदा कष्टी ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
आलीया भोगाशी असावे सादर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
आधी शिदोरी मग जेजूरी आधी भोजन मग देवपूजा
आले राजाजीच्या मना,तेथे कोणाचे चालेना श्रेष्ठ व्यक्तीच्या इच्छेपुढे कोणाचे काहीही चालत नाही .
आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वत:चाच फायदा साधून घेणे.
आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन डोळे अपेक्षेहून जास्त मिळणे .
आंधळं दळत,कुत्रं पीठ खातं  एकाने काम करावे,त्याचा फायदा दुसऱ्याने घ्यावा .


“इ” , “उ” , “ए”
 
इकडे आड तिकडे विहिर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती
इच्छा तसे फळ जशी वासना असते तसे फळ मिळते.
इन मीन सव्वातीन अगदीच अल्पसंख्या असणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे.
उसवल्यास दोरा भरी, निसवल्यास काय करी कोणतीही गोष्ट विकोपास गेल्यावर काहीही उपाय नसतो.
उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
उपट सूळ घे खांद्यावर नसते लचांड मागे लावून घेणे.
उडाला कावळा, बुडाला तर बेडूक निश्चित निर्णय न देणे.
उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे दर्शन.
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे श्रीमंत माणसांभोवती खुशमस्करे भोवतातच.
उधारीचे पोते, सव्वा हात रिते उधारीने बेतलेला माळ नेहमीच कमी भरतो, मेहेरबानीने मिळालेल्या वस्तूत कमतरता असतेच.
उंदराला मांजर साक्ष परस्परांच्या स्वार्थासाठी लबाड माणसांनी एकमेकांना साथ देणे
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टींचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये.
एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही.
एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे.
एक पुती रडे सात पुती रडे सगळेच जण असंतुष्ट असतात.
एका माळेचे मणी सगळेच सारखे, सगळेच सारख्या वृत्तीचे.
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही दोन सारख्या क्षमतेच्या व्यक्ती एकत्र राहू शकत नाही.
एवी न तेवी भर गो देवी प्रतिकूल परिस्थितीत रडत बसून काय उपयोग?
एक ना धड भराभर चिंध्या खूप कामे घेऊन एकही नीट न करणे.
ऐकावे जनाचे, करावे मनाचे सर्वांचा विचार घ्यावा व आपल्यास योग्य वाटेल तेच करावे.
ऐतखाऊ गोसावी, ताळभैरव बैरागी आळशी लोकांची कित्येक वेळा चंगळ असते.

" क "
कर नाही त्याला डर नाही ज्याने वाईट कृत्य केले नाही, त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
कनवटीला नाही पैसा आणि लोकांना म्हणे या बसा ऐपत नसताना बडेजाव करणे.
कसायला गाय धार्जीनी लोक दुष्ट आणि कठोर माणसांशी नम्रतेने वागतात.
करावे तसे भरावे  जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.
कागं बाई उभी,तर घरात दोघी तिघी घरात पुष्कळ जण काम करायला असले की आळस चढतो
कामापुरता मामा  आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा.
काखेत कळसा, गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे
कावळ्याच्या शापाने गाई मारत नसतात क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही.
काम नाही कवडीची रिकामपण नाही घडीचे काहीही काम नसतांना वेळच नाही असं दाखवणं.
कानामागून आली आणि तिखट झाली  श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
कुठे जागी भोगा तर तुझ्यापुढे उभा जे संकट येऊ नये असे वाटते तेच समोर येऊन उभे राहते.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ स्वार्थासाठी किंवा केवळ दुष्टबुध्दीने, शत्रूला मदत करून आपल्याच माणसांचे नुकसान करणे.
केला तुका, झाला मका दुसऱ्याच्यासाठी निर्माण केलेली अडचण स्वतःलाच भोगायला लागणे.
केश्या जाणे बारा, तर येश्या जाणे तेरा  शेरास सव्वाशेर असणे.
कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूष होतात.
कोणाची म्ह्स, कोणाला उठबस  काम एकाचे त्रास दुसऱ्याला 
कोळसा उगाळावा तितका काळाच  वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी, तितकी ती अधिकच वाईट ठरते.
कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं  लाजलज्जा पार सोडून देणे.

" ख "
खर्‍याला मरण नाही खरे कधी लपत नाही.
खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते खर्च करणार्‍याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.
खाण तशी माती आईबापाप्रमाणेच मुले
खाऊ जाणे ते पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
खायला काळ भुईला भार निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
खाई त्याला खवखवे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते.
खाऊन माजावे टाकून माजू नये अन्न, पैसा किंवा तत्सम गोष्टी वाया घालू नयेत, त्याचा योग्य वापर करावा.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
खोटयाच्या कपाळी सोटा खोटेपणा करणाऱ्याला शिक्षा भोगावी लागते.
खोट्याच्या कपाळी गोटा वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
खिळ्यासाठी नागलेला, नालासाठी घोडा गेला क्षुल्लक गोष्टीत हयगय केली तर क्रमाक्रमाने मोठा अनर्थ होऊ शकतो.

" ग "
ग ची बाधा झाली गर्व चढणे
गरज सरो नि वैद्य मरो आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
गवायचं पोर सुरातच रडतं पिढीजात धंदा असेल तर तो सहज साध्य होतो.
गळ्यात पडले झुंड हसून केले गोड गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते.
गळ्यातले तुटले ओटीत पडले     नुकसान होता होता टळणे.
गरजवंताला अक्कल नसते गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.
गणगोतानं भरलं गाव, तहान लागली विहिरीवर जावं पुष्कळ नातेवाईक असले तरी प्रसंगी एकही मदत करीत नाही. 
गर्जेल तो बरसेल (पडेल) काय केवळ गाजावाजा किंवा बडबड करणार्‍या व्यक्तीच्या हातून काही कार्य घडत नसते.
गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
गाय व्याली, शिंगी झाली अघटित घटना घडणे.
गाव तेथे महारवाडा प्रत्येक ठिकाणी काहीतरी वाईट घडतेच
गाव करी ते राव ना करी श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
गाव जळाला, मारुती गावा निराळा दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे.
गाढवाला गुळाची चव काय? मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा उपयोग करून घेणे.
गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो.
गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.
गाढवाच्या पाठीवर गोणी एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
गाढव्या गावात गाढवी सवाशिणी चांगल्याचा अभाव असतो तेथे सामान्य वस्तूलाही महत्व प्राप्त होते.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.
गुरुची विद्या गुरूला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
गोफण गेली तिकडे गोटा पडला इकडे कोणत्याही कामात ताळमेळ नसणे.
गोगलगाय नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
गोरागोमटा कपाळ करंटा दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
गोष्टी गोष्टी अन मेला कोष्टी गप्पा गोष्टीच्या नादात कामधंदा बाजूलाच राहतो आणि नुकसान होते


" घ "
घर ना दार देवळी बिर्‍हाड बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
घर पहावे बांधून लग्न पहावे करून अनुभवाने माणूस शहाणा होतो.
घर ना दार देवळी बिर्हाड शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती.
घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे
घरी असतील तुरी तर संचार करतील पोरी घरात सर्व सामग्री असेल तर घरगृहस्ती चांगली चालते.
घरात नाही कवडी म्हणे घेऊ शालजोडी ऐपत नसतांना शानशौकत करणे.
घडाई परिस मडाई जास्त मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.
घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
घरासारखा गुण सासू तशी सून घराच्या चालीरीती बाबतीत लहान माणसे मोठ्यांचे अनुकरण करतात.
घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी आई कुठेही असली तरी तिचे आपल्या मुलांकडे लक्ष असते.
घे सुरी घाल उरी फाजील उत्सुकता किंवा उत्साह शेवटी घटक ठरतो.
घोडे खाई भाडे धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
घेता दिवाळी देता शिमगा घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.
घोडे कमावते आणि गाढव खाते एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा.
घोडी मेली ओझ्यानं शिंगरू मेलं हेलपाट्यानं काम करणारा कष्टाने मारतो तर कमी कुवतीचा त्याच्याबरोबर वावरल्याने मारतो.

" च " 
 
तो पडेल उत्कर्षासाठी  धडपडणाऱ्याला अपयश आले तर त्यात कमीपणा नाही .
चार दिवस  सासूचे,चार दिवस  सुनेचे  प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची आयुष्यात संधी मिळतेच
चोराच्या मनात चांदणे   वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.
चव ना ढव, दडपून जेव    स्वयंपाकाला चव नसली तरी भरपूर जेवायला आग्रह करणे
चालत्या गाडीला खीळ व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे 
चांदणे चोराला, ऊन घुबडाला चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाही
चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे   प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा महत्त्व प्राप्त होतेच. सर्व दिवस सारखेच नसतात
चाल बैला चाल, हरळीवर माती घाल काही ना काही काम करा अथवा कमीत कमी काम करतो असे तरी दाखवा
चित्त नाही थारी, बावन तीर्थे करी   मनाला समाधान नसले, तर तीर्थयात्रा करूनही ते मिळत नाही  

ज "
 
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?             ज्याला सर्व सूखे प्राप्त झाली आहेत, असा या जगात कोणीही नाही          
जन्मा घालील तो भाकर देईलच   जो आपणास जन्म देतो तो आपले पालनपोषण करतोच करतो 
जसा गुरू तसा चेला   गुरू जसे शिक्षण देईल, तसेच विद्यार्थी तयार होतील 
जसा भाव तसा देव  ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याप्रमाणेच फळ मिळते 
ज्याचा खावा ठोंबारा, त्याचा राखावा उंबरा  ज्याचे अन्न खावे त्याच्याशी एकनिष्ठ असावे   
जिकडे सुई तिकडे दोरा प्रमुख व्यक्तीच्या मागे त्याच्या हाताखाली काम करणारे लोक असतात 
जित रोटी मेलिया माती जिवंतपणी अन्न मेल्यावर मूठमाती 
जे न देखे रवि ते देखे कवि कवि आपल्या कल्पनेच्या जोरावर वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो 
जेथे जेथे धूर तेथे अग्नी  कार्य आहे तेथे कारण असतेच 

" झ 
 
झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी        ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे         
झाड जावो, पण हाड न जावो  नुकसान सोसावे, पण धर्मत्याग करू नये 
झाकली मूठ सव्वा लाखाची   आपल्याजवळ जे आहे त्याविषयी न सांगितलेलेच बरे       

" ट " 
 
टक्के टोणपे खाल्याशिवाय मोठेपण येत नाही    अनुभव आल्याशिवाय, संकटातून गेल्याशिवाय उन्नती होत नाही         
टिटवी देखील समुद्र आटविते   क्षुद्र माणुसही प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतो  

" ड 
 
डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही         कोणतीच गोष्ट साध्य होत नाही           
डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये    कसरत करत वागावे लागणे    
डोळा तर फुटू नये आणि काडीवर मोडू नये    अत्यंत कुशलतापूर्वक कार्य करणे       

" ढ " 
 
ढोरात ढोर पोरात पोर                                     वाटेल तेथे समावणारा मनुष्य            
ढोंग धत्तूरा, हाती कटोरा     ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास शेवटी नुकसानच होते      

" त " 
तरुण वकील, वृद्ध वैध                                  तरुण वकील तडफदार असतो व म्हातारा वैद्य तरुणापेक्षा अधिक चांगल्या रीतीने रोग ओळखतो           
ताकापुरते रामायण      आपले काम साधण्यापुरते आर्जव       
ताटाखालचे मांजर   दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे   
तुकारामबुवाची मेख   अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे, पण शेवटी निराशाच पदरी पडणे 
तहान लागल्यावर विहीर खणणे  एखाद्या गोष्टीची गरज पडल्यावरच त्यावर उपाय शोधणे
तू नाही तर तुझा बाप  एखादे काम एकाने नाही केले तरी दुसरा करणारच आहे 

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0214841366