वचन (Singular-Plural)


वचन :-
कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की , एकापेक्षा अधिक आहे हे
समजते ,त्यालाच त्या नामाचे वचन म्हणतात .

वचनचे दोन प्रकार आहेत .

एकवचन :- ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते.
उदाहरणार्थ:फुल , झाड , वही

अनेकवचन :- ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे अनेकवचन असते. उदाहरणार्थ:फुले , झाडे , वह्या

खालील अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) एक घर - अनेक घरे
२) एक सफरचंद - अनेक सफरचंदे
३) एक फूल - अनेक फुले
४) एक चिमणी - अनेक चिमण्या

वरील वाक्यांतील -

१) घर - या नामावरून एका घराचा बोध होतो.
    घरे - या नामावरून अनेक घरांचा बोध होतो.
२) सफरचंद - या नामावरून एका सफरचंदाचा बोध होतो.
    सफरचंदे - या नामावरून अनेक सफरचंदांचा बोध होतो.
३) फूल - या नामावरून एका फुलाचा  बोध होतो.
    फुले - या नामावरून अनेक फुलांचा बोध होतो.
४)चिमणी - या नामावरून एका चिमणीचा बोध होतो.
    चिमण्या - या नामावरून अनेक चिमण्यांचा बोध होतो.
 
एकवचन अनेकवचन
घर घरे
सफरचंद सफरचंदे
फूल फुले
चिमणी चिमण्या

वचनबदल :-
एकवचनी शब्दांचे अनेकवचनी शब्दांत रूपांतर करणे आणि अनेकवचनी शब्दांचे एकवचनी शब्दांत रूपांतर करणे , याला वचनबदल असे म्हणतात .
उदाहरणार्थ :-

१) अनय वही आण .
वरील वाक्यात वही हे एकवचन आहे , त्याचे वचन बदल करून आपण वाक्य लिहू .
उ. अनय वह्या आण .

२) जय फळ खातो .
वरील वाक्यात फळ हे एकवचन आहे , त्याचे वचन बदल करून आपण वाक्य लिहू .
उ. जय फळे खातो .

१) पुल्लिंगी नामांचे अनेकवचन

आ <--> ए

 
एकवचन अनेकवचन
अभ्रा अभ्रे
अंगरखा अंगरखे
अंगठा अंगठे
आंबा आंबे
ओढा ओढे
ओटा ओटे
उकिरडा उकिरडे
कायदा कायदे
काटा काटे
कांदा कांदे
किनारा किनारे
कोपरा कोपरे
कोळसा कोळसे
कोल्हा कोल्हे
कुत्रा कुत्रे
खड्डा खड्डे
खांदा खांदे
गळा गळे
गोळा गोळे
गोठा गोठे
गुन्हा गुन्हे
गुडघा गुडघे
घोडा घोडे
चेहरा चेहरे
चुल्हा चुल्हे
चिमटा चिमटे
झरा झरे
झोका झोके
टांगा टांगे
टिळा टिळे
ठिपका ठिपके
डबा डबे
डोळा डोळे
जिल्हा जिल्हे
ढिगारा ढिगारे
तवा तवे
तालुका तालुके
ताशा ताशे
तुकडा तुकडे
थवा थवे
दरवाजा दरवाजे
दवाखाना दवाखाने
दागिना दागिने
दाणा दाणे
देखावा देखावे
दिवा दिवे
धडा धडे
धबधबा धबधबे
धागा धागे
धंदा धंदे
नमुना नमुने
नकाशा नकाशे
नाला नाले
निखारा निखारे

२) स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन

१) अ <--> आ

 
एकवचन अनेकवचन
काच काचा
खूण खुणा
चूक चुका
जखम जखमा
जीभ जिभा
चिंच चिंचा
झुळूक झुळका
झोप झोपा
तारीख तारखा
नजर नजरा
फौज फौजा
बाग बागा
बंदूक बंदुका
माळ माळा
मान माना
मोट मोटा
मिरवणूक मिरवणुका
मौज मौजा
रांग रांगा
लाट लाटा
वाट वाटा
वेळ वेळा
वीज विजा
वीट विटा 
सून सुना
हाक हाका

२)  अ <--> ई

 
एकवचन अनेकवचन
अडचण अडचणी
आठवण आठवणी
ओळ ओळी
इमारत इमारती
केळ केळी
किंमत किंमती
गाय गायी
गोष्ट गोष्टी
गंमत गंमती
चाहूल चाहुली
चोच चोची
जमीन जमिनी
जास्वंद जास्वंदी
दुपार दुपारी
दुर्बीण दुर्बीणी
तलवार तलवारी
तक्रार तक्रारी
पखाल पखाली
पेन्सिल पेन्सिली
बोर बोरी
बोट बोटी
भिंत भिंती
मुलाखत मुलाखती
म्हैस म्हशी
रात्र रात्री
लकेर लकेरी
वेल वेली
विहीर विहिरी
सहल सहली
सकाळ सकाळी
सायकल  सायकली
साल साली
हिरवळ हिरवळी 

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0254139900