क्रियापद (Verb)


क्रियापद ( Verb ) :-
कर्त्याने काय क्रिया केली हे क्रियापदामुळे आपल्याला समजते त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-
रविवारी सकाळी आम्ही आरामात ८-८.३० ला उठतो.
आई मला गरमगरम खायला देते.
मग मी मित्रांसोबत खेळायला जातो.
दुपारी आम्ही सगळे - मी, आई व बाबा सोबत गप्पा करीत जेवतो.
त्या दिवशी आई खास मेनू बनवते.

वरील परिच्छेदात अधोरेखित शब्दामुळे कर्त्याने कोणती क्रिया केली हे समजते , आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। अधोरेखित शब्द खालील क्रिया दाखवतात.
 
क्रियावाचक  शब्द  क्रिया
उठतो उठण्याची
देते देण्याची
जातो जाण्याची
जेवतो जेवण्याची
बनवते बनवण्याची
 
 

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0250208378