काळ (Tense)


काळ  ( Tense ) :-
क्रियापदाच्या रुपावरुन त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते , याचा जो बोध होतो , त्याला काळ असे म्हणतात .
क्रियापद (Verb) म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय.

उदाहरणार्थ :-
१) विनय व्याकरण शिकतो .
२) विनय व्याकरण शिकला .
३) विनय व्याकरण शिकेल .

वरील वाक्यात अनुक्रमे
१) क्रिया आता घडत आहे , हे कळते .
२) क्रिया पूर्वी होऊन गेल्याचे कळते .
३) क्रिया पुढे घडणार आहे, हे कळते .
 

मराठी भाषेत प्रमुख तीन काळ आहेत :
१) वर्तमानकाळ
२) भूतकाळ
३) भविष्यकाळ

१) वर्तमानकाळ :-
जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो.
उदाहरणार्थ :-
१) विनय व्याकरण शिकतो .
२) मी पुस्तक वाचतो .
३) गाय चारा खाते.

‘शिकतो, वाचतो, खाते या क्रियापदाच्या रूपांवरून क्रिया आता घडत आहे, असा बोध होतो ; म्हणून शिकतो, वाचतो, खाते‘  हि वर्तमानकाळी क्रियापदे आहेत.

२) भूतकाळ :-
जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन क्रिया पूर्वी घडली आहे, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो.
उदाहरणार्थ :-
१) विनय व्याकरण शिकला.
२) मी पुस्तक वाचले.
३) गायीने चारा खाल्ला.
‘शिकला, वाचले, खाल्ला‘ या क्रियापदाच्या रूपांवरून क्रिया पूर्वी घडली आहे, असा बोध होतो ; म्हणून ‘शिकला, वाचले, खाल्ला‘ हि भूतकाळी क्रियापदे आहेत.

३) भविष्यकाळ :-
जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ :-
१) विनय व्याकरण शिकेल.
२) मी पुस्तक वाचेन.
३) गाय चारा खाईल.
‘शिकेल, वाचेन, खाईल‘ या क्रियापदाच्या रूपांवरून क्रिया पूर्वी घडली आहे, असा बोध होतो ; म्हणून ‘शिकेल, वाचेन, खाईल‘ हि भविष्यकाळी क्रियापदे आहेत.


काळांचे उपप्रकार :-
 

मुख्य काळ काळांचे उपप्रकार व उदा.
वर्तमानकाळ १) साधा वर्तमानकाळ - राधा अभ्यास करते.
२) अपूर्ण वर्तमानकाळ - राधा अभ्यास करीत आहे.
३) पूर्ण वर्तमानकाळ - राधाने अभ्यास केला आहे.
४) रीति वर्तमानकाळ - राधा अभ्यास करीत असते.
भूतकाळ १) साधा भूतकाळ - राधाने अभ्यास केला.
२) अपूर्ण भूतकाळ - राधा अभ्यास करीत होती.
३) पूर्ण भूतकाळ - राधाने अभ्यास केला होता.
४) रीति भूतकाळ - राधा अभ्यास करीत असे.
भविष्यकाळ १) साधा भविष्यकाळ - राधा अभ्यास करील.
२) अपूर्ण भविष्यकाळ - राधा अभ्यास करीत असेल.
३) पूर्ण भविष्यकाळ - राधाने अभ्यास केला असेल.
४) रीति भविष्यकाळ - राधा अभ्यास करीत जाईल.


१) साधा काळ :- वाक्यातील क्रियापद एकेरी असेल तर 'साधा काळ' असतो.

साधा वर्तमानकाळ - मी जेवण करतो.
साधा भूतकाळ -  मी जेवण केले.
साधा भविष्यकाळ - साधा मी जेवण करेल.

२) चालू / अपूर्ण काळ :- वाक्यातील क्रियापद संयुक्त असून कृदंताच्या शेवटी ' त ' प्रत्यय असेल व क्रियापदाचे त्या-त्या काळातील रूपे असतील तर 'अपूर्ण काळ' होतो.

अपूर्ण वर्तमानकाळ - मी जेवण करत आहे.
अपूर्ण भूतकाळ - मी जेवण करत होतो.
अपूर्ण भविष्यकाळ - मी जेवण करत असेल.

३) पूर्ण काळ :- वाक्यातील क्रियापद संयुक्त असून कृदंताच्या शेवटी ' ल ' प्रत्यय असेल व क्रियापदाचे त्या-त्या काळातील रूपे (सहायक क्रियापद)  असतील तर 'पूर्ण काळ' होतो.

पूर्ण वर्तमानकाळ - मी जेवण केले आहे.
पूर्ण भूतकाळ - मी जेवण करत होतो.
पूर्ण भविष्यकाळ - मी जेवण केले असेल.

४) रीति काळ :- वाक्यातील क्रियापद संयुक्त असून कृदंताच्या शेवटी ' त ' प्रत्यय असेल व क्रियापदाचे त्या-त्या काळातील रूपे  असतील तर 'रीति काळ' होतो.

रीति वर्तमानकाळ - मी जेवण करत असतो.
रीति भूतकाळ - मी जेवण करत असे.
रीति भविष्यकाळ - मी जेवण करत जाईन.

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0258111954